CM Pramod Sawant: गोव्यात होणार ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया उर्जा प्रकल्प?

Table of Contents
Issue Date

Green Hydrogen Green Ammonia Plant in Goa: सन 2050 पर्यंत अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रे डीकार्बनाईझ करण्याच्या सरकारचे महत्वांकाक्षी लक्ष्य आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून गोवा सरकार ऊर्जा निर्मितीसाठी ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया प्लांट उभारणार आहे.

हे प्लांट विकसित करण्यासाठी परदीप फॉस्फेट्स, BITS गोवा आणि NIT गोवा यांच्याशी सरकार चर्चा करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. एमएसएमई आणि फार्मास्युटिकल क्षेत्रासाठी शाश्वत ऊर्जा आणि पर्यावरणीय समाधान या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.

Green Hydrogen Green Ammonia Plant in Goa
Arpora News: हडफडेत फुटबॉल मैदानात राडा; खेळाडुने केली थेट पंचांनाच मारहाण, पाहा व्हिडिओ…

सावंत म्हणाले की, गोवा सरकार अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी बहु-क्षेत्रीय योजनेवर काम करत आहे. विशेषतः उद्योगांसाठी, गोवा सरकार अनेक नवीकरणीय ऊर्जा हस्तक्षेप स्वीकारण्याच्या प्रक्रियेत आहे.

त्यात ऊर्जा, औद्योगिक क्षेत्र R&D साठी बेंचमार्किंग आणि नाविन्यपूर्ण ऊर्जा सहाय्य तंत्रज्ञान विकसित करण्यााठी समर्थन प्रायोगिकरण समाविष्ट आहे.

MSME साठी ऊर्जा ऑडिट, जीवाश्म आधारित उर्जा स्त्रोतांपासून स्वच्छ ऊर्जा पर्यायांकडे संक्रमण आणि औद्योगिक कॉम्प्रेस्ड बायोगॅस किंवा बायोमास अवशेष आणि सौर थर्मल केंद्रीत वापरास प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे.

Green Hydrogen Green Ammonia Plant in Goa
CM Pramod Sawant: शाळांमध्ये रोबोटिक शिक्षण देणारे गोवा पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची माहिती
ते म्हणाले की, राज्याला पर्यटन, वाहतूक, उद्योग, आरोग्य, कृषी तसेच अन्न या क्षेत्रांत डीकार्बनाईज करायचे आहे. आम्ही ग्रीन हायड्रोजन धोरण आणि उद्योगांसाठी शून्य कार्बन उत्सर्जन धोरण विकसित करत आहोत. ते लवकरच स्वीकारले जाईल.

गोवा सरकारने प्रायोगिक ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया प्रकल्पासाठी परदीप फॉस्फेट्सशी चर्चा सुरू केली आहे. राज्यात ग्रीन हायड्रोजन संशोधन सुविधा उभारण्यासाठी आम्ही बीआयटीएस आणि एनआयटी गोवा यांच्याशी चर्चा करत आहोत.

मुख्यमंत्री म्हणाले, गोवा सरकारने केलेले सर्व नवीन वीज खरेदी करार अक्षय ऊर्जेसाठी असतील. गोव्याने ग्राऊंड माउंटेड आणि फ्लोटिंग सोलर इन्स्टॉलेशन उभारण्यासाठी सामंजस्य करारावरही सवाक्षरी केली आहे.

2050 पर्यंत सर्व क्षेत्रांना 100 टक्के नूतनीकरणक्षम वीज पुरविली जाईल, असेही सरकारने ठरवले आहे. त्यांनी सर्व औषध कंपन्यांना ऊर्जा कार्यक्षमता तंत्रज्ञानाच्या शिफारशी लागू करण्याचे आवाहन केले.

video
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.